
सांगली – मूळचा सांगलीतील असलेला दोघांनी विवाह करण्याचे ठरवले होते; मात्र मुसलमान तरुणीने विवाहासाठी ‘माझा धर्म स्वीकारावा लागेल’, अशी अट त्याला घातली. या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता. त्यातूनच ‘दुर्वांकने आत्महत्या केली’, असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.
१. दुर्वांक काही दिवसांपूर्वी सांगलीत आला होता. त्याच्या घराजवळ रहाणार्या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक मुसलमान तरुणी अधून-मधून येत होती. ती त्या महिलेची नातेवाईक होती. तरुणीची दुर्वांकशी ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
२. स्वतःच्या भ्रमणभाषमधील ‘बॅलन्स’ (पैसा) संपल्यामुळे दुर्वांकने त्याच्या आईच्या भ्रमणभाषवरून संबंधित तरुणीशी संपर्क साधला होता.पुणे येथे नोकरी करणारा दुर्वांक शेवाळे हा १९ वर्षांचा हिंदु तरुण कोल्हापूच्या एका मुसलमान तरुणीच्या प्रेमात पडला.
३. त्या दोघांमधील संभाषण पोलिसांना दाखवूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा अन्वेषण केलेले नाही. पोलिसांकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
४. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या नातेवाइकांनी अद्याप फिर्याद दिलेली नाही.
प्रकरणाचे सखोल अन्वेषण करा ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

धर्मपरिवर्तनावरून हिंदु तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडणार्या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्यात यावे, तसेच या प्रकरणात जे सहभागी आहेत, त्या सर्वांचे अन्वेषण करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिले. हे निवेदन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी स्वीकारले.
या प्रसंगी धारकरी सर्वश्री राहुल बोळाज, हणमंत पवार, सचिन पवार, सौरभ सटाले, शुभम गवळी, अमित पवार, अण्णा थोरात, प्रताप बानकर, अवधूत रणदिवे, शुभम खोत, गणेश सलगर, अमोल खराडे उपस्थित होते.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !