उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

मथुरा (उत्तरप्रदेश) : येथे आसिफ कुरेशी नावाच्या मुसलमान तरुणाने ‘राहुल’ असे हिंदु नाव सांगून एका हिंदु तरुणीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. या वेळी त्याने पीडित हिंदु तरुणीवर अनेक वेळा बलात्कार केला आणि तिचे अश्लील छायाचित्रे काढून अश्लील व्हिडिओ बनवले. नंतर त्याने हे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे यांच्या माध्यमातून हिंदु तरुणीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणणे चालू केले. काही दिवसांनी राहुलचे खरे नाव आसिफ कुरेशी असल्याचे पीडित तरुणीला समजले. ३० जुलै २०२४ या दिवशी पीडित तरुणीने आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप केला आहे. आसिफ कुरेशी याने २ मे २०२४ या दिवशी मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत आसिफ कुरेशी याने तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणला, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादविरोधी कायदा कितीही कठोर केला, तरी धर्मांध मुसलमान त्याला जराही भीक घालत नाहीत, हेच या घटनेवरून दिसून येते ! सरकारने आता अशांना जरब बसेल, अशी कारवाई त्यांच्या विरोधात केली पाहिजे ! |
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !