बेंगळुरू (कर्नाटक) शहरातील घटना
बेंगळुरू (कर्नाटक) – रस्त्याच्या मधोमध खिळे फेकून वाहनांचे टायर पंक्चर केले जातात, अशी अफवा आधीपासूनच होती. आता बेंगळुरू शहरातील जालहळ्ळीच्या कुवेंपू सर्कलच्या भुयारी मार्गामध्ये मुठभर खिळे एकाच ठिकाणी सापडले असून स्वतः वाहतूक पोलिसांनीच हे खिळे काढून स्वच्छता मोहीम राबवली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
या ठिकाणी अजूनही खिळे असू शकतात; म्हणून लोकांना सतर्क रहावे, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक व्यवसाय होण्यासाठी जवळच्या पंक्चर काढण्याचे काम करणार्यांनी खिळे फेकले असावेत, या शक्यतेने पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकापंक्चर काढण्याची कामे कोण करतात, हे देशातील जनतेला ठाऊक असल्याने याला आता ‘पंक्चर जिहाद’ म्हणायचे का ? |