१ आतंकवादी ठार
श्रीनगर –जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे २७ जुलैला सकाळी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एका सैनिकाला वीरगती प्राप्त झाली. या आक्रमणात एका मेजरसह ४ सैनिक घायाळ झाले आहेत. या चकमकीत १ पाकिस्तानी आतंकवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. तो पाकिस्तानी ‘बॉर्डर अॅक्शन टीम’चा कमांडो असल्याचा संशय आहे. कुपवाडाच्या कामकरी भागात पाकिस्तानी आतंकवादी लपल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षादलाच्या सैनिकांनी ही शोधमोहीम चालू केली. (जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात भारतीय सैन्यदलाचे सैनिक वीरगतीला प्राप्त होत आहेत. तरी येथील आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्या पाकिस्तानवर कारवाई करण्यास भारत विलंब करत आहे, असेच सर्वसामान्य भारतियांना वाटते ! – संपादक)