‘प.पू. डॉक्टर, आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! माझ्या मनातील विचार मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
१. ‘या जगात माझ्यासाठी २ अनमोल शब्द आहेत. ते म्हणजे ‘माझे गुरुदेव’!
अ. माझी धनदौलत, सुख, शांती आणि समाधान, म्हणजे माझे गुरुदेव !
आ. माझा श्वास, म्हणजे माझे गुरुदेव !
इ. माझा प्राण, म्हणजे माझे गुरुदेव !
ई. माझे जीवन, म्हणजे माझे गुरुदेव, प.पू. डॉक्टर !
२. माझी जेव्हा प.पू. डॉक्टर यांच्याशी सत्संगातून भेट होते, तेव्हा ती माझ्यासाठी अनमोल, अविस्मरणीय, आनंददायी आणि शाश्वत असते; कारण ही जिवा-शिवाची भेट असते.
३. प्रार्थना : ‘प.पू. डॉक्टर, ‘आपण माझ्या हृदयात आणि मी आपल्या चरणांपाशी असावे. तसेच माझ्या हृदयातील गुरुभक्ती आपणच वृद्धींगत करा’, ही भावपूर्ण प्रार्थना करते.
४. कृतज्ञता : हे गुरुदेवा, ‘आपण मला जिवंत ठेवले. माझा श्वास चालू ठेवला आणि माझ्या शरिरात प्राण घातले आहेत; म्हणूनच माझे अस्तित्व आहे. आपण माझे योगक्षेम वहाता. अनेक युगे आणि अनेक जन्म आपण मला सांभाळले आहे. आपण मला या जन्मात फुलासारखे जपत आहात’, याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त कशी करायची, हे मला समजत नाही. आपण दिलेल्या प्रत्येक आनंददायी क्षणासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा. (६.२.२०२४)