मुंबई – नागपाडा (मुंबई) येथून जप्त करण्यात आलेल्या ३१ किलो वजनाच्या ‘मॅफेड्रोन’ (एम्.डी.) या अमली पदार्थाच्या प्रकरणी महिनाभरापासून शोध चालू असलेल्या सुफियान खान याला पोलिसांनी वाशी (नवी मुंबई) येथून अटक केली आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
२६ जून या दिवशी ‘मॅफेड्रोन’ हा ६० कोटी रुपये इतके मूल्य असलेला अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी ‘नौशीन’ नावाच्या महिलेसह मुशरफ आणि सैफ यांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्याकडे ६९ लाख रुपये सापडले होते. सुफियान खान हा मुख्य आरोपी असल्याचे उघड झाल्यावर पोलीस त्याच्या शोधात होते. सुफियान शिवडी येथे अमली पदार्थ तस्करीचे काम करत होता. त्याच्याकडून अन्य तस्करांचा शोध लागेल, असे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थ तस्करीचे उद्यान बनलेला भारत ! |