Maulana Tauqeer Raza : २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांचे धर्मांतर करून त्यांचे मुसलमानांशी लग्न लावण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला !

  • उत्तरप्रदेशमध्ये मौलाना तौकीर रझा यांनी २१ जुलै या दिवशी केले होते आयोजन !

  • हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यावर प्रशासनाला जाग !

(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)

मौलाना तौकीर रझा खान

बरेली – इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे (‘आय.एम्.सी.’चे) अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान (Maulana Tauqeer Raza Khan) यांनी २१ जुलै या दिवशी शहरामध्ये प्रस्तावित धर्मांतर आणि सामूहिक विवाह आयोजित करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. प्रशासनाने याविषयी कठोर भूमिका घेतल्यानंतर परिषदेने रात्री उशिरा एक प्रसिद्धीपत्रक काढून हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती दिली.

१. ‘बरेली येथे २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांनी त्यांचे धर्मांतर करून नंतर मुसलमानांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे’, असे विधान मौलाना तौकीर रझा खान यांनी केले होते. पहिल्या टप्प्यात २१ जुलैला ५ जोडप्यांचे सामूहिक विवाह होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. याविषयी परिषदेने नगर दंडाधिकार्‍यांकडे अनुमती मागितली होती.

२. या कार्यक्रमाची माहिती मिळताच हिंदु संघटनांनी जोरदार विरोध केला. भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष राजेश अग्रवाल यांनीही तीव्र निषेध करत ‘प्रशासनाने याची नोंद घ्यायला हवी होती. मौलाना तौकीर राजा नेहमीच हिंदूंच्या सणांविषयी वादग्रस्त विधाने करतात’, असे म्हटले होते.

३. अग्रवाल, तसेच अन्य धर्माभिमानी यांनी निषेध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि कार्यक्रम आयोजित न करण्याविषयी चेतावणी दिली.

संपादकीय भूमिका 

  • हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यावर जागे झालेले प्रशासन काय कामाचे ? भारतात पोलीस आणि प्रशासन यांनी हिंदूंना वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे भविष्यात हिंदूंवर काही संकट ओढवले, तर पोलीस अन् प्रशासन यांच्यावर अवलंबून रहाणे, हे हास्यास्पद ठरेल !
  • असा कार्यक्रम आयोजित करण्याचे दुःसाहस कुणी पुन्हा कधी करणार नाही, असा दरारा हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक !