‘यावर्षीचा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत झाला. या महोत्सवाच्या सेवांमध्ये येऊ शकणार्या संभाव्य अडचणी, तसेच ज्या अडचणी प्रत्यक्षात आल्या, त्यांची माहिती येथे दिली आहे. ‘या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कोणते नामजपादी आध्यात्मिक उपाय केले ? हे उपाय किती कालावधीकरता केले ? ते कुणी केले आणि त्यांचा परिणाम काय झाला ?’, यांची माहिती येथे सारणीस्वरूपात देण्यात आली आहे.
यातून लक्षात येते, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करायचे प्रत्येक कार्य म्हणजे एक प्रकारे सूक्ष्मातील युद्धच आहे.’ त्यामुळे ते आध्यात्मिक स्तरावर लढावे लागते. आम्हा साधकांना हे युद्ध गुरु आणि ईश्वर यांच्या कृपेने जिंकता येत आहे. यासाठी आम्ही साधक त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.७.२०२४)
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |