१. ‘वर्ष २०२३ या दिवशी माझ्यासह आश्रमात रहाणारे आणि प्रसाराची सेवा करणारे संत यांना परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. तेव्हा तेथे ‘विशाल पोकळी आहे’, असे मला जाणवत होते.
२. सत्संगात ‘क्षीरसागरात गुरुदेव शेषशय्येवर विराजमान आहेत’, असे मला जाणवले. ‘क्षीरसागर हा दुधाचा असतो’, असे म्हटले जाते; परंतु तो ‘आनंद लहरींचा सागर आहे’, असे मला वाटले.
३. ‘तिन्ही गुरूंचे एक मूर्तस्वरूप, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म गुरु डॉ. जयंत आठवले आहेत’, असे जाणवणे : सत्, चित् आणि आनंद या गुणांपैकी आनंदसागर हा क्षीरसागर असून सत् आणि चित् स्वरूपी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या महालक्ष्मी स्वरूपात आहेत’, असे मला भासत होते. ‘या तिन्ही स्वरूपांचे एक मूर्तस्वरूप, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत’, असे मला जाणवले.
४. गुरुदेवांनी ‘आज संतांच्या सत्संगात काय वाटले ?’, असे विचारले असता आलेल्या अनुभूती
अ. मला प्रारंभी पुष्कळ आनंद जाणवला. माझ्या अंगावर रोमांच आले आणि मन शांत झाले.
आ. सत्संगात ‘विविध संतधारांचा संगम होत आहे’, असे मला जाणवले. प्रसाराची सेवा करणारे आणि आश्रमात रहाणारे यांतील संतधारांचा तो संगम हा आनंद द्विगुणित करणारा होता.
इ. मी हे गुरुदेवांना सांगत असतांना माझ्या पाठीच्या कण्यातून (सुषुम्नेतून) शीतलहर मूलाधारापासून वर वर आली. ती शीतलहर दोन्ही कानांतून प्रक्षेपित होत असतांना कानांच्या वरच्या भागातील डोक्यात स्पंदन रूपात रूपांतरित झाली. ती गोल गोल चक्राकार गतीने ब्रह्मरंध्रापर्यंत गेली. तो आनंदही तेथे अव्यक्त झाला.’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय मार्गदर्शक. (वर्ष २०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |