इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजीत नुकत्याच घडलेल्या अतीप्रसंग घटनेतील धर्मांध जिहाद्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा, अनधिकृत धार्मिक बांधकामे रोखावीत, ‘वक्फ बोर्ड’ विसर्जित करावे, धर्मांध शिक्षण देणार्या मदरसा बंद कराव्यात, गो-तस्करी आणि गो-हत्या करणार्यांच्या विरोधात ‘मोक्का’प्रमाणे (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी) कडक कायदा करावा, गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणे हटवावीत, समान नागरी कायद्याची कार्यवाही करावी यांसह अन्य मागण्यांसाठी येथील गांधी पुतळ्यासमोर सकल हिंदु समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, सर्वश्री शिवजी व्यास, प्रवीण सावंत, विश्वनाथ दायमा, मंगेश मस्कर, राकेश पुरानी, मोहन मालवणकर, उमाकांत दाभोळे, भगवान कांडेकर, इचलकरंजी गुजराती समाज, इचलकरंजी मारवाडी युवा मंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.