(PPT हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.)
१. श्री. प्रसाद गुरव (मुख्य पुरोहित, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान), वीर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘पीपीटी’ पाहून माझ्या लक्षात आले, ‘कलेला भावमय करून साकारले, तर भगवंत भेटतो.’
२. श्री. मोहन भैरवकर (मुख्य पुरोहित आणि विश्वस्त, श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान), सासवड, पुणे.
अ. ‘मी भजन, गायन आणि स्तोत्र या माध्यमातून मिळणारे अनुभव घेत असतो. ‘पीपीटी’ पाहून त्यामागचे शास्त्र समजून घ्यावे’, असे मला वाटले.’
३. ह.भ.प. दत्तात्रय चोरघे, पुणे.
अ. ‘मी भजनी गायक असल्यामुळे ‘पीपीटी’ पाहून भावविभोर झालो. ‘खरोखर संगीत हीसुद्धा एक साधना आहे’, हे माझ्या लक्षात आले.
४. श्री. दिलीप हिवरेकर (विश्वस्त, श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान), हिवरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.
अ. ‘पीपीटी’ पाहून माझ्या लक्षात आले, ‘आपण देवावर श्रद्धा ठेवून संगीत वाजवल्यास संगीतात देवत्व येते.’
५. श्री. प्रशांत कोतवाल (राष्ट्रीय संघटन मंत्री, भारत रक्षा मंच), ठाणे, महाराष्ट्र.
अ. ‘पीपीटी’ पाहून ‘पुष्कळच उपयुक्त संशोधन आहे’, असे मला वाटले. आज मला खर्या अर्थाने नटराज रूपाचे महत्त्व समजले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)