‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. या महोत्सवात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

मुंबईतील ‘नेशन फर्स्ट कलेक्टिव’च्या महासचिव सुश्री ज्योत्स्ना गर्ग यांना आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची माहिती सांगतांना श्री. योगेश गंद्रे
डावीकडून शिकारीपूर (शिवमोग्गा, कर्नाटक) येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री. रामांजनया, ठाणे (महाराष्ट्र) येथील भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. प्रशांत कोतवाल, हुगली (बंगाल) येथील महाभारत संघाचे कार्यकर्ते सर्वश्री तरुण मंडल, गौरीशंकर साव आणि अविजित पाल यांना सात्त्विक कलाकृतींची माहिती सांगतांना श्री. अमेय लोटलीकर