कीव (युक्रेन) – युक्रेनच्या सैन्याने रशियाची अत्याधुनिक एस्-५०० ही हवाई क्षेपणास्त्र प्रणाली अमेरिकेने पुरवलेल्या ‘आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टिम’चा वापर करून उद्ध्वस्त केलीे. युक्रेनचे पत्रकार आंद्री जपलेन्को यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलद्वारे ही माहिती दिली. एका टॅक्टिकल क्षेपणास्त्राची किंमत अनुमाने ५ सहस्र कोटी रुपये आहे. ‘एस्-५००’ ही पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. भारताने रशियाकडून एस्-४०० ही प्रणाली विकत घेतलेली आहे. त्यामुळे जर ‘एस्-५००’ ही प्रणाली नष्ट होत असेल, तर भारतालाही सुरक्षेविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे.