रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. शंकर खराल, पोखरा, नेपाळ.

अ. ‘आश्रम अतिशय सुंदर आहे. येथे ज्ञानवर्धक, शांती आणि सात्त्विकता यांचा मार्ग दर्शवणारे तत्त्वज्ञान आहे !’

२. श्री. जगन्नाथ कोइराला (जिल्हा अध्यक्ष, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ), पोखरा-४, कास्की, जिल्हा गंडकी प्रदेश, नेपाळ.

अ. ‘आश्रम पुष्कळ मनमोहक वाटला.

आ. हिंदु जनजागृतीचे जे कार्य करत आहात, ते पुष्कळ कौतुकास्पद आहे.

इ. आश्रमात चाललेले हिंदु जागृतीचे कार्य अनुकरणीय आहे.

ई. आता याप्रमाणेच नेपाळमध्येही अजून पुष्कळ कार्य करण्याची स्फूर्ती मिळाली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)

महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री देशपांडे (अखिल भारतीय संत समिती, धर्मसमाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख), महर्षी पंचायतन, सिद्धपीठम्, नाशिक.

अ. ‘आपण कलियुगात नव्हे, तर ‘कला’युगात आहोत’, असे मला वाटले.
आ. येथे आध्यात्मिक शक्तीसह वैज्ञानिक दृष्टीकोनाची उपासनाही आहे.’(२४.६.२०२४)

३. महामंडलेश्वर आचार्य नर्मदा शंकर पुरीजी महाराज, झोटवाडा, जिल्हा जयपूर, राजस्थान.

अ. ‘आध्यात्मिक ऊर्जेने व्याप्त असलेली आश्रमाची व्यवस्था पाहून मन अत्यंत प्रसन्न झाले.

आ. आश्रमाच्या प्रत्येक क्रियाकलापात सकारात्मक ऊर्जा जाणवली.

इ. ‘हिंदु राष्ट्राचे स्वप्न निश्चितच साकार होईल’, यात कोणतीही शंका नाही. शुभेच्छा !’

४. समता देवी, पाटलीपुत्र (पाटणा), बिहार.

अ. ‘आश्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले.

आ. मन शांत झाले.

इ. या जीवनाचा उद्देश समजला.’

५. श्री. प्रभाष रंजन ठाकूर, पाटलीपुत्र (पाटणा), बिहार.

अ. ‘आश्रमात मनुष्य जीवनाचा खरा अर्थ आणि मानवतेची मूल्ये पहायला मिळाली.

आ. आश्रमात आल्यावर पुष्कळ प्रमाणात सकारात्मकता जाणवली.

इ. आश्रमातील सर्व व्यवस्था सूक्ष्म स्तरावर केल्याचे आढळले, म्हणजे प्रत्येक वस्तूचा विनियोग ईश्वरी कार्यासाठी केला जात आहे.’

६. श्री. आशुतोष चतुर्वेदी, कृष्ण सदन, नवादा, तालुका आरा, जिल्हा भोजपूर, बिहार.

अ. ‘आश्रमात सुखद अनुभूती आली.

आ. आश्रमाच्या मुख्य द्वारातून प्रवेश करताच वातावरणात सकारात्मक ऊर्जा जाणवते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २३.६.२०२४)

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

श्री. आशुतोष चतुर्वेदी, नवादा, तालुका आरा, जिल्हा भोजपूर, बिहार.
‘आध्यात्मिक शक्ती समवेतच ईश्वराची अनुभूती आणि नामजप करण्याचे लाभ समजले.’ (२३.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.