अयोध्येतील श्रीराममंदिर परिसरात गोळी लागल्याने सैनिकाचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

अयोध्या – येथील श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका सैनिकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. १९ जूनला पहाटे ही घटना घडली. शत्रुघ्न विश्‍वकर्मा असे या सैनिकाचे नाव असून ते २५ वर्षांचे होते. ते आंबेडकरनगर येथील रहिवासी होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे श्रीराममंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज आला. सहकारी सुरक्षा कर्मचारी धावत आले तेव्हा त्यांनी पाहिले की, विश्‍वकर्मा यांना गोळी लागली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सैनिकाच्या मृत्यूने मंदिर परिसरात खळबळ उडाली. पोलीस महानिरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोचले. प्राथमिक अन्वेषणात ही आत्महत्या किंवा अपघात असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.