India On Kashmir : जम्मू-काश्मीर प्रकरणी हस्तक्षेप करू नका !

भारताचे पाक-चीनला प्रत्युत्तर !

(डावीकडून) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

नवी देहली –  कोणत्याही देशाला काश्मीरच्या प्रकरणात भाष्य करण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत भारताने पाकिस्तान आणि चीन यांना सुनावले. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ नुकतेच चीनच्या ५ दिवसांच्या दौर्‍यावर गेले होते. तेथे या दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रसारित केले होते. यात चीनने जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या एकतर्फी कारवाईला विरोध असल्याचे म्हटले होते. ‘हा प्रश्‍न संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार शांततेने सोडवला गेला पाहिजे’, असे म्हटले होते. त्यावर भारताने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाचे काही काम पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमध्ये करायचे आहे. या क्षेत्रात होणार्‍या कोणत्याही कामाला भारताचा विरोध आहे.

संपादकीय भूमिका

पाक आणि चीन यांना समजेल अशाच भाषेत आता सांगण्याची आवश्यकता आहे !