वाराणसी (उत्तरप्रदेश) – तमिळनाडूमधील ‘हिंदू मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी त्यांच्या काही पदाधिकार्यांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती, तसेच समितीचे उत्तरप्रदेश-बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते. ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सवाच्या कालावधीतील शुभ मुहूर्तावर श्री. अर्जुन संपथ आश्रमात आले आहेत’, असे सद्गुरु नीलेश सिंगबाळ आश्रमात असलेल्या श्रीराममंदिरात श्री. संपथ यांना म्हणाले. हे ऐकून श्री. अर्जुन संपथ यांचा भाव जागृत झाला.