चेंबूर (मुंबई) येथे सिलिंडरच्या स्फोटात ९ जण घायाळ !

मुंबई – चेंबूरमध्ये कॅम्प परिसरात सीजी गिडवानी मार्गावर एका घरामध्ये ६ जून या दिवशी सकाळी ७ वाजता झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात ९ जण घायाळ झाले. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोचले. घायाळ व्यक्तींना खासगी उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या, तसेच गाड्यांच्या काचा फुटल्या. यामागे कोणता घातपात नाही ना ?, याचे पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.