Pornography Allowed  on ‘X’:‘एक्स’वर अश्‍लील मजकूर प्रसारित करण्यास इलॉन मस्क यांची अनुमती !

भारतात अशा मजकुरावर किंवा ‘एक्स’वरच बंदी येण्याची शक्यता !

नवी देहली – सामाजिक माध्यम ‘एक्स’चे मालक इलॉन मस्क यांनी एक्सवर अश्‍लील मजकूर प्रसारित करण्याची अनुमती दिली आहे. असा अश्‍लील मजकूर कुणाला दिसेल आणि कुणाला नाही ?, याविषयी आस्थापनाने नियमावली प्रसारित केली आहे. भारतात अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी असल्याने ‘एक्स’वरील अश्‍लील मजकुरावरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

‘एक्स’ने अश्‍लील मजकुराच्या धोरणाच्या संदर्भात लिहिले आहे की, वापरकर्ते आता लैंगिकतेच्या संकल्पनेवर मजकूर सिद्ध करून तो प्रसारित करू शकतात किंवा पाहू शकतात; परंतु असा मजकूर सर्व संमतीने आणि वैध पद्धतीने बनवला गेला पाहिजे.