Election Results : अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या ३२ जागा काँग्रेसच्या खिशात !

‘भाजप आरक्षण संपवेल’ या प्रचाराचा काँग्रेसला मोठा लाभ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी

नवी देहली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप पुन्हा सत्तेत आला, तर मागास घटकांचे आरक्षण संपवेल, असा दावा राहुल गांधी यांनी सतत केला. परिणामी अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या ३२ जागा काँग्रेसने आरामात खिशात घातल्या. गेल्या वेळेच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या केवळ ९ जागा मिळाल्या होत्या. भाजपला यंदा अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या २४ जागा गमवाव्या लागल्या.

बिहारमध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेनंतर देशातील अनेक राज्यांत अशी जनगणना व्हावी; म्हणून मागणी पुढे आली. ‘इंडी’ आघाडीने देशभर अशी जनगणना करावी, अशी मागणी केली. भाजपविरुद्ध हे एक मोठे सूत्र ठरले.

उत्तरप्रदेशमध्ये मागावर्गीय समाजाची समाजवादी पक्षाला पसंती

भाजपला सर्वांत मोठा फटका उत्तरप्रदेशात बसला. येथील मागासवर्गीय समाजाने यंदा भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षाला निवडले. गेल्या वेळी समाजवादी पक्षाकडे  एकही आरक्षित जागा नव्हती, यंदा अशा ७ जागा या पक्षाने मिळवल्या.