रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सिद्ध

१ सहस्र ४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात !

रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून या दिवशी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.

सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन सिद्ध झाले आहे. सोहळ्यासाठी १ सहस्र ४०० पोलीस अधिकारी आणि अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.