|

बुरहानपूर (मध्यप्रदेश) – येथे कथित इस्लामविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचा आरोप करत मुसलमान जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
प्रसारमाध्यमांतील एका वृत्तानुसार,
१. बुरहानपूर जिल्ह्यातील गणपती नाका परिसरातील रहिवासी शोहराबुद्दीन कुरेशी याने जतन नावाच्या हिंदु तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. जतनने ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’चा संदर्भ देत ती इस्लामविरोधी असल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला.
२. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अन्वेषण चालू केले; मात्र त्यापूर्वीच मुसलमान समाजातील १०० हून अधिक लोकांनी गोंधळ घालणे चालू केले.
३. मुसलमानांचा जमाव हिंसक बनला आणि त्याने बुरहानपूरमधील इतवारा गेट परिसरात रहाणार्या जतनच्या घरावर आक्रमण केले.
४. या आक्रमणाची माहिती मिळताच जतनच्या समर्थनार्थ लोक जमा झाले. तेव्हा दोन्ही बाजूंनी दगडफेक चालू झाली.

५. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. मुसलमानांनी पोलिसांवरही दगडफेक केली. याविषयीचा एका व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये हिंसक जमाव ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देतांना दिसत आहे.
६. या घटनेनंतर पोलिसांनी जतन याला अटक केली आहे. जतनच्या घरावर आक्रमण करणार्या मुसलमानांवरही पोलिसांनी कारवाई करणे चालू केले आहे. एकूण १०६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
संपादकीय भूमिका
|
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !