अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाच्या दागिन्यांच्या दुकानावर दरोडा !

१२ ते १५ दरोडेखोरांचा सहभाग

दरोडा घालण्यात आलेले अमेरिकेतील ‘भिंडी ज्वेलर्स’चे दुकान

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नेवार्क येथे एका भारतीय वंशांच्या अमेरिकी नागरिकाच्या दागिन्यांच्या दुकानावर दरोडा घालण्यात आला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, नेमके किती रुपयांची लूट झाली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ही रक्कम मोठी आहे.

‘भिंडी ज्वेलर्स’ असे या दुकानाचे नाव आहे. २९ मेच्या मध्यरात्री ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, १२ ते १५ पुरुष आणि महिला मास्क आणि हातमोजे घालून दुकानाच्या काचा फोडून आत घुसले. त्यांनी सोन्याच्या अंगठ्या, महागडी घड्याळे आणि हिर्‍यांचे हार चोरले. दुकानामध्ये इतके दागिने होते की, त्यांना ते नीट लुटताही आले नाही. पळतांना त्यांच्या हातातील दागिने  भूमीवर पडत होते. नंतर ते ४ चारचाकी वाहनांतून पळून गेले.