Major Radhika Sen : मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रांकडून सैन्य पुरस्कार !

मेजर राधिका सेन

नवी देहली – काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेमध्ये सेवा बजावलेल्या भारतीय महिला मेजर राधिका सेन यांना सैनिकी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस त्यांच्या हस्ते ह पुरस्कार देण्यात येणार आहे. मेजर राधिका सेन यांना ३० मे या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक दिना’च्या निमित्ताने ‘२०२३ युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर एड्व्होकेट ऑफ द इयर पुरस्कार’ हा देण्यात येणार आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना राधिका सेन म्हणाल्या  की, आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी सन्मान आहे.

मेजर राधिका सेन मार्च २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत ‘इंडियन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियन’च्या कमांडर म्हणून काँगो प्रजासत्ताकच्या पूर्व भागात तैनात होत्या. राधिका सेन मूळच्या हिमाचल प्रदेशच्या आहेत. वर्ष १९९३ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी बायोटेक इंजिनिअरमध्ये पदवी प्राप्त करून नंतर भारतीय सैन्यात गेल्या.