पालघर येथे मालगाडीचे ८ डबे घसरले, वाहतूक ठप्प !

पालघर – स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वेस्थानकाच्या लगत घसरली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मालगाडीचे ८ डबे घसरले. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद रहाण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेचे ३ टॅ्रक बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.