१४.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला होता. त्या वेळी जळगाव येथील श्री. गजानन तांबट यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘यज्ञाला आरंभ झाल्यावर यज्ञाच्या समोर परात्पर गुरु डॉक्टर शुभ्र वस्त्र धारण करून यज्ञाकडे पहात आहेत’, असे दिसले.
२. ‘गुरुदेवांच्या छायाचित्राखाली सोनेरी प्रकाश जाणवला आणि तो यज्ञात टाकलेल्या आहुतीचा प्रकाश आहे’, असे मला वाटत होते. प्रत्यक्षात तेथे निरांजन लावले होते.
३. ‘यज्ञाचा लाभ करून घेतांना त्यातून निघणारा धूर सर्व साधकांभोवती पसरत आहे’, असे मला जाणवले. आरंभी मला थोडा त्रास झाला; पण प्रार्थना केल्यावर माझ्यावरील आवरण उणावले आणि मला हलके वाटू लागले. ‘सर्व साधक यज्ञात सहभागी आहेत’, असे मला वाटले. काही सेकंदासाठी मला यज्ञातील धुराचा सुगंधही आला.
४. ‘प्रत्यक्ष चामुंडामाताच यज्ञ करून घेत आहे’, असे मला जाणवत होते.
५. गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला.’
– श्री. गजानन तांबट, जळगाव (१५.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |