१. वाराणसी आश्रमातील चैतन्यामुळे निसर्गदेवतेचा आशीर्वाद लाभून पेरूंवर पडणारी कीड नष्ट होणे आणि अधिक अन् गोड पेरू लागणे
‘वाराणसी आश्रमात काही वर्षांपूर्वीची २ पेरूची झाडे आहेत. या झाडांना लागलेले पेरू थोडे मोठे झाले की, त्यांच्यावर कीड येते. त्यामुळे ते खाण्यायोग्य रहात नाहीत; मात्र या वर्षी पेरूला कीड लागण्याचे प्रमाण न्यून होऊन पेरूचा आकारही थोडा मोठा झाला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत पेरूही अधिक लागले आहेत. ते पेरू खातांना मनाला पुष्कळ आनंद मिळत आहे. ‘इतके चवदार अन् मोठे पेरू आपल्याच आश्रमातील आहेत’, यावर आमचा विश्वासच बसत नाही. ‘हे सर्व आश्रमातील चैतन्य आणि निसर्गदेवतेची कृपा यांमुळे होत आहे. निसर्गदेवता आणि आश्रमदेवता आम्हाला भरभरून देत आहे’, अशी अनुभूती येत आहे.
२. वाराणसी आश्रमातील चैतन्याचा परिणाम जवळपासच्या परिसरावर होऊन जवळपासच्या पेरूच्या झाडांनाही अधिक पेरू लागणे
आश्रमाच्या शेजारी रहाणार्या लोकांनी आश्रमाच्या सीमेजवळ पेरूची झाडे लावली आहेत. त्या झाडांना आश्रमातील पेरूच्या झाडांप्रमाणेच अधिक आणि मोठ्या आकाराचे पेरू लागले आहेत. ती पेरूची झाडे सेवाकेंद्राच्या बाजूला झुकली असून त्यांना सेवाकेंद्राच्या बाजूलाच अधिक पेरू आले आहेत. हे पाहून ‘सेवाकेंद्रातील चैतन्यामुळे निसर्गदेवतेची कृपा होत आहे’, अशी अनुभूती आली.
ही अनुभूती देऊन आम्हा सर्व साधकांना आनंद देणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– कु. जया सिंह, वाराणसी आश्रम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २३ वर्षे)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |