हिंदु तरुणींना जागृत करून हिंदूंचे प्रबळ संघटन करणे हाच ‘लव्ह जिहाद’वर खरा उपाय ! – टी. राजा सिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा आमदार, भाजप

  • सांगली येथे ‘लव्ह जिहाद आणि लँड जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा !

  • देशातील प्रत्येक हिंदूंने धर्माचरण करून राष्ट्रसेवेसाठी योगदान देण्यासह हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करण्याचे आवाहन !

सभेत बोलतांना प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि आमदार टी. राजा सिंह

सांगली, २७ मे (वार्ता.) – ‘हिंदु तरुणी आणि महिला यांच्यावर अत्याचार करून त्यांना वाममार्गाला लावण्याचे षड्यंत्र देशात राबवले जात आहे. याच्या विरोधात समाजाने जात, पात, पंथ, पक्ष, प्रांतवाद यामध्ये न अडकता हिंदु म्हणून भगव्या ध्वजाखाली संघटित झाले पाहिजे. असे न केल्यास ‘लव्ह जिहाद’ला अनेक तरुणी बळी पडतील. त्यासाठी देशातील प्रत्येक हिंदूंने धर्माचरण करून राष्ट्रसेवेसाठी योगदान देण्यासह हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करावा, तसेच ‘लव्ह जिहाद’ला थांबवण्यासाठी हिंदु तरुणींना जागृत करणे आणि हिंदूंचे प्रभावी संघटन निर्माण करणे हाच पर्याय आहे’, असे उद्गार तेलंगाणा (भाग्यनगर) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजा सिंह यांनी येथे केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्याशी वार्तालाप करतांना आमदार टी. राजा सिंह

२६ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, गोहत्या बंदी आणि गोरक्षक कायदा करावा, या मागण्यांसाठी आयोजित केलेल्या मोर्च्यात उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. शहरातील झुलेलाल चौक, शिवतीर्थ, मारुति चौक, बालाजी चौक, कापड पेठ मार्गे महापालिका, स्टेशन चौक, काँग्रेस भवन या मार्गाने श्रीराममंदिरपर्यंत हा मोर्चा निघाला. श्रीराममंदिर चौक येथे मोर्च्याची सांगता होऊन त्याचे सभेत रूपांतर झाले.

उपस्थित मान्यवर…

मोर्च्यात सहभागी झालेले आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीनराजे शिंदे

प.पू. ईश्वरबुवा रामदासी (भाळवणी), ईश्वर भक्त चंद्रशेखर कोडोलीकर, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, पैलवान पृथ्वीराज पवार, माजी नगरसेवक मकरंद देशपांडे, डॉ. भालचंद्र साठे, दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, भाजपचे ओंकार शुक्ल, माजी आमदार नितीनराजे शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले, नीलेश हिंगमिरे, केदार खाडिलकर, अधिवक्त्या (सौ.) स्वातीताई शिंदे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, तानाजी घारगे, अनिता हारगे, हिंदु एकता आंदोलनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, रामभाऊ मेथे, माझी महापौर सौ. संगीताताई खोत, अधिवक्ता अमोल बोळाज, सुहास कलघटगी, माधुरी वसगडेकर, सोमनाथ गोटखिंडे, अनघा कुलकर्णी, काजल कांबळे, राजाभाऊ शिंदे, गीतांजली धोपे पाटील यांसह अन्य मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्च्यात सहभागी झालेले संत प.पू. ईश्वरबुवा रामदासी, भाळवणी

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांची कार्यपद्धत अवलंबावी !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह म्हणाले, ‘‘काँग्रेसने वर्ष १९४८ पासूनच बहुसंख्य हिंदु असणार्‍या भारत देशाचे इस्लामीकरण करण्याचा डाव आखला होता. केवळ महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून ‘लव्ह जिहाद’ची सहस्रों प्रकरणे घडवली गेली. देशभर हे लोण पसरत आहे. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिकवणीनुसार  कार्यपद्धती अवलंबली पाहिजे. राजकारण, समाजकारण यात परिस्थिती पाहून रंग पालटणारे नेते निर्माण  होत आहेत; मात्र त्यांना हिंदु हिताची ठाम भूमिका घेण्यास भाग पाडले पाहिजे. हिंदूंना वेगळे कायदे आणि मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार मोकळीक हे मोडून काढल्यास आतंकवाद, ‘लव्ह जिहाद’सारख्या अपप्रकारांना आळा बसेल.’’

उपस्थित हिंदुत्वनिष्ठांसमवेत आमदार टी. राजा सिंह

हिंदु तरुणांची सहस्रोंची फौज गावोगावी निर्माण  करून लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करा !

श्री. टी. राजा सिंह म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र भारतातील अनेक राज्यांत, तसेच नेपाळमध्ये चालू आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी विधानसभेत याविषयी माहिती देतांना महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची १ लाखांहून अधिक प्रकरणे पोलिसांकडे नोंद आहेत, असे सांगितले. उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही आता ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात लवकरात लवकर कायदा करावा, हीच मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहे. लोकसंख्या जिहाद, लव्ह जिहाद आणि वक्फ कायद्यांच्या आधाराने लँड जिहाद करून भारताची भूमी बळकावून ‘गजवा-ए-हिंद’ या युद्धाद्वारे भारताचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणावर चालू आहे. वक्फ कायद्यावर आधारित वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भारतामध्ये १० लाख एकरहून अधिक भूमी, तसेच महाराष्ट्रात १ लाख २६ सहस्र एकर भूमी मुसलमानांनी बळकवली आहे. लोकसंख्या जिहाद करून मुसलमानांची संख्या स्वातंत्र्यानंतर ४३ टक्क्यांनी वाढली आहे. ‘एक दिवस या भारतात भुरखाधारी महिला पंतप्रधान बनेल’, असे धर्मांध असदुद्दीन ओवैसी म्हणत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदु तरुणींच्या घरोघरी जाऊन त्यांचे प्रबोधन करून त्यांचे आई-वडील आणि त्यांना ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात जागृत करणे अत्यावश्यक आहे. संघटित हिदु तरुणांची सहस्रोंची फौज गावोगावी निर्माण करून आपल्या लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करून हे थांबवता येईल. ‘काशी मथुरा तो झाकी है, हिंदु राष्ट्र बाकी है’ अशी गर्जना करून भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प हिंदूंनी करावा’, असे आवाहन त्यांनी केले.

शेकडो मोर्चे काढून हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यास शासनाला भाग पाडावे ! – सागर बेग, गोरक्षक, श्रीरामपूर (अहिल्यानगर)

गोरक्षक श्री. सागर बेग म्हणाले, ‘‘हिंदूंनी महाराष्ट्रात आजवर ५७ हून अधिक मोर्चे काढले. तरीही ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आजवर झाला नाही. याचा अर्थ आपला शासनावर दबाव अल्प पडत आहे, हे लक्षात घेऊन यापुढे शेकडो मोर्चे काढून शासन आणि प्रशासनास महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यास भाग पाडले पाहिजे. बहुसंख्य हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी वापरले जाणारे संविधानातील २५ क्रमांकाचे प्रावधान रहित करण्यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव टाकावा. अहिल्यानगर येथे १३ वर्षीय मागासवर्गीय हिंदु मुलीवर धर्मांधांनी अनेक महिन्यांपासून अत्याचार केले. तेव्हा तेथील पोलीस प्रशासन तक्रार नोंदवून घेत नव्हते. आम्ही आंदोलन करून तक्रार नोंद न करणार्‍या जिल्हा पोलीस प्रमुखास बडतर्फ करण्यास प्रशासनास भाग पाडले. असे केले, तरच सर्वत्र हिंदूंना न्याय मिळेल हे लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. कर्नाटक, उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतर, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा व्हायला हवा. दुर्दैवाने हिंदु समाज आणि नेतेही मूग गिळून गप्प बसतात. मतदानाविषयी फतवे निघतात. हे रोखण्याची आवश्यकता आहे.’’

मोर्च्याला उपस्थित असलेले हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी

मोर्च्यातील मागण्या अशा..

१. वक्फ बोर्डाच्या अनधिकृतपणे बळकावलेल्या भूमी कह्यात घ्याव्यात.

२. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणून जनदरावर चाप आणावा.

३. गोरक्षण आणि गोमांस विक्री प्रतिबंध कायदा लागू करावा.

४. ‘लव्ह जिहाद’ केल्यास, तर उत्तरप्रदेशप्रमाणे संबंधित धर्मांध मुसलमानांच्या घरादारावर बुलडोझर चालवावा.

५. धर्मांतरण कायदा देशभर लागू करून प्रभावी कार्यवाही करावी.

मोर्चामध्ये दिलेल्या घोषणा…

१. पूनम आणि महिलांच्या हत्येचा जाहीर निषेध

२. जय श्रीराम, जय हिंदु राष्ट्र

३. एक पिडीत भगिनी साथीला लाखो-भगिनी

४. आवाज उठा अब शस्त्र उठा

५. अब अश्रू नही अब आख दिखा

६. अब्दुल की दिवानी बनोगी तो फ्रीज और सुटकेस मे पाओगे

७. ‘हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, हिंदु धर्म की जय’

८. धर्म को छोडकर जाओगी टुकडो मे काटी जाओगी ।

९. हिंदू को जगाना होगा जिहादियो को भगना होगा ।

क्षणचित्रे…

१. मोर्च्यात महिलांनी भगवी वस्त्रे, तर पुरुषांनी भगवी टोपी परिधान केली होती.

२. मोर्च्याच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

३. मोर्च्यातील घोषणा आणि आमदार टी. राजा सिंह यांना पहाण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.

४. हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या घोषणांमुळे सांगली शहर दणाणून गेले.