सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांच्या खोलीत असतांना आणि खोलीच्या बाहेर बसलेले असतांना साधकांना जाणवलेले पालट

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले खोलीत असतांना

१ अ. श्री. अमित डगवार 

श्री. अमित डगवार

१ अ १. शारीरिक स्तरावर : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले खोलीत जातांना मला जडपणा जाणवला आणि डोक्यावर दाब जाणवला. खोलीच्या मध्यभागी गेल्यावर मला उष्णता जाणवत होती.

१ अ २. मनाच्या स्तरावर : त्यांच्या खोलीत प्रवेश करतांना मला प्रसन्न वाटत होते. थोडे आत गेल्यावर माझा ‘ॐ’चा नामजप होऊ लागला. खोलीच्या मध्यभागी गेल्यावर माझा भाव दाटून आला. ‘माझ्या अनाहतचक्रातून ‘ॐ’चा नामजप होत आहे’, असे मला जाणवले.’

१ आ. श्री. भानु पुराणिक (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

श्री. भानु पुराणिक

१ आ १. शारीरिक स्तरावर : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत जातांना माझे शरीर जड होऊ लागले. खोलीच्या आत गेल्यावर माझे पाय जड झाले.

१ आ २. मनाच्या स्तरावर : त्यांच्या खोलीत प्रवेश करतांना माझा श्वास मंद होऊ लागला. खोलीच्या थोडे आत गेल्यावर माझी भावजागृती होऊ लागली. खोलीच्या मध्यभागी गेल्यावर माझा भाव दाटून आला.’

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांच्या खोलीच्या बाहेर बसलेले असतांना

२ अ. श्री. अमित डगवार

२ अ १. शारीरिक स्तरावर : ‘खोलीच्या मध्यभागी गेल्यावर मला उष्णता जाणवत होती. खोलीतून बाहेर येतांना मला दाब जाणवत होता. हस्तप्रक्षालनपात्र (बेसीन) असलेल्या ठिकाणी गेल्यावर माझे पाय दुखू लागले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बसलेल्या ठिकाणी जात असतांना माझ्या पायाचा जडपणा आणि वेदना वाढल्या.

२ अ २. मनाच्या स्तरावर : त्यांच्या खोलीत प्रवेश करतांना मला प्रसन्न वाटत होते. थोडे आत गेल्यावर माझा ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप आपोआप चालू झाला. खोलीच्या मध्यभागी गेल्यावर माझा भाव दाटून आला.’

२ आ. श्री. भानु पुराणिक

(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

२ आ १. शारीरिक स्तरावर : ‘त्यांच्या खोलीत जातांना काही जाणवले नाही; पण खोलीतून बाहेर येतांना वातावरणात दाब जाणवून ‘कशाचा तरी विरोध होत आहे’, असे मला जाणवत होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बसलेल्या ठिकाणी जात असतांना हा विरोध वाढत होता.

२ आ २. मनाच्या स्तरावर : १ आ २ प्रमाणेच जाणवले.’

३. विश्लेषण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या खोलीत मनाच्या स्तरावर चांगल्या संवेदना जाणवतात. त्यांच्या व्यापक स्तरावरील समष्टी कार्यामुळे त्यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे होत असतात. त्यामुळे शारीरिक स्तरावर त्रासदायक संवेदना जाणवतात.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २८.१०.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.