Congress Reservation To ‘Vote Jihad’ : काँग्रेसला सर्वांचे आरक्षण काढून घेऊन ते ‘व्होट जिहाद’वाल्या मुसलमानांना द्यायचे आहे !

पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल !

‘व्होट जिहाद’

शिमला (हिमाचल प्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ मे या दिवशी हिमाचल प्रदेशच्या दौर्‍यावर होते. त्यांनी नाहान, सिरमौर आणि मंडी येथे झालेल्या जाहीर सभांना संबोधित केले. ते म्हणाले की, काँग्रेसला सर्वांचे आरक्षण हिसकावून ‘व्होट जिहाद’ची भाषा करणार्‍या मुसलमानांना द्यायचे आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ओबीसींचे (अन्य मागासवर्गीय यांचे) अधिकार हिरावून घेऊन ते मुसलमानांना देण्यात आले. काँग्रेस आणि ‘इंडी’ आघाडीचे (काँग्रेस आणि मित्र पक्ष यांच्या आघाडीचे) हे षड्यंत्र आहे, हे लक्षात घ्या, असेही पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की,


१. काँग्रेसचे युग जनतेने पाहिले आहे. त्या काळात पाकिस्तान आमच्या डोक्यावर नाचत असे आणि काँग्रेस सरकार मात्र जगभर विनवणी करत फिरत असे.

२. भारत यापुढे जगाकडे पैसे मागणार नाही. भारत स्वबळावर लढत आहे. भारत घरात घुसून मारत आहे. आज पाकिस्तानची अवस्था काय झाली आहे ?, ते तुम्ही बघू शकता.

३. काँग्रेसने स्वत:चा बचाव करण्यासाठी भारताचे सीमाभाग सोडून दिले. जेव्हा सीमेवर रस्ता बनवण्याचा प्रसंग आला, तेव्हा ते घाबरले. त्यांना वाटले की, रस्ता बनवून शत्रू आत येईल. आम्ही सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. यामुळे सीमेवर रहाणारे लोक आणि सैनिक यांचे जीवन सुसह्य झाले आहे.