पनवेल येथे अश्लील व्हिडिओ बघून भावाकडून बहिणीवर अत्याचार

प्रतिकात्मक छायाचित्र

पनवेल – अश्लील (पॉर्न) व्हिडिओ पाहून १५ वर्षीय अल्पवयीन भावाने बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याची घटना घडली आहे. यातून १३ वर्षीय बहीण गरोदर राहिली आहे. या प्रकरणी भावावर ‘पोक्सो’ कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीला गर्भपात करण्यासाठी वाशीतील महानगरपालिका रुग्णालयात नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या मुलांचे आई-वडील कामावर जातात. दोघे बहीण-भाऊ घरात एकटेच असतांना त्यांनी भ्रमणभाषवर संभोगाचे व्हिडिओ बघितले होते. जानेवारीमध्ये पीडित मुलीच्या भावाने आपल्या बहिणीसमवेत बळजोरीने शरीरसंबंध केले होते. वाशी रुग्णालयातील डॉक्टरांनी वाशी पोलिसांना याविषयीची माहिती दिली.

संपादकीय भूमिका 

भ्रमणभाष वापरण्याची मोकळीक आणि धर्मसंस्कारांचा अभाव यांमुळे समाजाची कशी अधोगती होत आहे, याचेच हे उदाहरण आहे !