नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारताने प्रथमच मत मांडले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे तेथील साधनांची लूट केली जात आहे. लोकांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात असून तेथील प्रशासनाकडून लोकांचे शोषण होत आहे.