बालपणापासूनच सात्त्विकतेची ओढ असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा ठाणे येथील कु. मुकुल प्रसाद पेंढारकर (वय ११ वर्षे)!

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. मुकुल याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे.’ – संकलक)

 

कु. मुकुल प्रसाद पेंढारकर
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

 – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘मुकुलमध्ये शिकण्याची वृत्ती आहे’, असे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

२. कधी त्याच्या आजी-आजोबांचे हात-पाय दुखत असतील, तर तो त्यांचे हात-पाय चेपतो. तो त्याच्या आईला घरकामात साहाय्य करतो. तिला बरे नसले, तर तो तिची काळजी घेतो.

३. सात्त्विकतेची ओढ

श्री. प्रसाद पेंढारकर

मुकुल स्नानापूर्वी जलदेवतेला प्रार्थना करतो. तो नियमितपणे देवाचे श्लोक आणि स्तोत्र म्हणतो. त्याला पूजा करायला आणि शंख वाजवायला आवडते. ‘सर्व ठिकाणी बाप्पा (देव) आहे’, असा त्याचा भाव असतो. तो अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपति आणि सरस्वती यांना प्रार्थना करतो. तो २१ वेळा गणपति आणि दत्त यांचा नामजप करतो. तो प्रत्येक रविवारी बालसत्संगाला उपस्थित रहातो.

४. धर्माचरण करणे

तो नेहमी टिळा लावूनच बाहेर जातो. तो प्रतिदिन सकाळी संध्या करतो, प्रार्थना करतो, तसेच पुरुषसूक्त आणि श्रीसूक्त म्हणतो.

५. सेवेची आवड

अ. त्याने त्याच्या शिकवणीच्या शिक्षिका आणि बसमधील मित्र यांना ‘सनातन पंचांगा’चे महत्त्व सांगितले.

आ. एकदा तो माझ्या समवेत हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आला होता. त्या वेळी त्याने मला ‘आसंद्या लावणे, सुखासनावर (सोफ्यावर) चादर घालणे, व्यासपिठाच्या संबंधित सेवा करणे’ इत्यादी सेवांमध्ये साहाय्य केले.

६. जाणवलेला पालट

पूर्वी मुकुल अबोल होता; पण आता तो मनमोकळेपणाने बोलतो.

७. स्वभावदोष

रागीटपणा, प्रतिमा जपणे आणि मोठ्याने बोलणे.

– श्री. प्रसाद पेंढारकर (मुकुलचे वडील), ठाणे (फेब्रुवारी २०२४)


११.१२.२०१९ या दिवशी झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्या’च्या वेळी बालसाधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

१. कु. मुक्ता प्रसाद पेंढारकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय १३ वर्षे), ठाणे

अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्या’च्या वेळी माझा जप आणि प्रार्थना चालू होती.

आ. जेव्हा एक साधक बासरी वाजवत होते, तेव्हा ‘आता आपण नृत्य करूया’, असे मला वाटले. त्यानंतर मी कृष्णाच्या समवेत नृत्य करत आहे’, असे मला जाणवले.

इ. जेव्हा ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे (वय ५५ वर्षे) सतार वाजवत होते, तेव्हा मला जाणवले की, श्री सरस्वतीदेवीच सतार वाजवत आहे आणि तिच्या मोरावर मी बसले आहे.

ई. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १७ वर्षे) नृत्य करत असतांना ‘गणपतीच नृत्य करत आहे’, असे मला वाटले.

उ. परम पूज्यांच्या कपाळावर उमटलेले कमळ पाहून मला वाटले की, माझ्याही अंगावर असे कमळ उमटावे.’

२. कु. मुकुल प्रसाद पेंढारकर (आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय ११ वर्षे), ठाणे 

अ. ‘बासरी ऐकतांना मला वाटले की, पृथ्वीवर एका ठिकाणी कृष्णबाप्पा बासरी वाजवत आहे. नंतर मला वाटले की, कृष्ण आपल्या बागेत बासरी वाजवत आहे.’ (वर्ष २०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या http://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक