‘उकाड्यामुळे गोवा राज्यातील सर्व १ सहस्र ७२५ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या निवडणुकीत ८० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, असा विश्वास आहे, अशी माहिती गोवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.’ (६.५.२०२४)