काँग्रेसचे आमदार राजू कागे यांचे संतापजनक विधान !
बेळगाव – ‘लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मरण पावले, तर आणखीन कुणी पंतप्रधान होणार नाही का ?’ असे विधान करणारे काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी आणखी एक आक्षेपार्ह विधान केले आहे. कागवाड तालुक्यातील जुगुळ या गावात प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार करतांना ते म्हणाले की, हिंदु कार्यकर्ते हे ठावठिकाण नसलेले भिक्षुक आहेत.
आमदार कागे पुढे असेही म्हणाले की, लोकांच्या समस्या दूर केल्यानंतर आम्ही देवस्थाने निर्माण करू. भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘जय श्रीराम’ एवढीच घोषणा देता येते.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात काँग्रेसचे आमदार अशा प्रकारची विधाने करतात; कारण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, हे त्यांना ठाऊक आहे ! |