मुर्शिदाबाद (बंगाल) येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांची हिंदूंना धमकी !
कोलकाता (बंगाल) – मुर्शिदाबादमध्ये तुम्ही (हिंदू) ३० टक्के आणि आम्ही मुसलमान ७० टक्के आहोत. येथे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, तर मुसलमान शांत बसणार नाहीत. दोन घंट्यांत भागीरथी (गंगा) नदीत तुम्हाला न बुडवल्यास मी राजकारण सोडीन, अशी धमकी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी एका प्रचार सभेत दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
(सौजन्य : Zee News)
बंगालमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले, तर काय होईल ?, याचा विचार करा ! – भाजप
कबीर यांच्या धमकीवर भाजप माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करतांना म्हटले की, मुर्शिदाबादमध्ये हिंदूंची संख्या केवळ २८ टक्के आहे. विचार करा, बाकी बंगालमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले, तर काय होईल ? बंगालमध्ये लांगूलचालनाच्या राजकारणाने नवा नीचांक गाठला आहे. या आमदाराला पक्षातून हाकलून देण्याचे धाडस ममता बॅनर्जी करणार का ?
At the booth workers sammelan at Shaktipur, TMC’s Bharatpur MLA Humayun Kabir said:
Quote
If I can't throw BJP into the Bhagirathi river within 2 hours, will leave politics. I will not let you guys stay in the Shaktipur (most Hindus in this area are refugees, who fled from… pic.twitter.com/EMRTFMg26T
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 2, 2024
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी हुमायून यांचे हे विधान हिंदूंना पूर्णपणे नष्ट करण्याच्या षड्यंत्राचे संकेत असल्याचे म्हटले आहे.
'You are 30%, we are 70%, we will drown you in the Ganges' – #TrinamoolCongress MLA Humayun Kabir issues threat to Hindus in #Murshidabad (#Bengal)
'Consider what will happen if Hindus become a minority in Bengal," warns the BJP
This threat indicates the potential future… pic.twitter.com/368WCj0GQd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2024
संपादकीय भूमिका
|