मराठीची कमाल बघा !

अडीच अक्षरांचा कृष्ण ।
अडीच अक्षरांची लक्ष्मी ।
अडीच अक्षरांची श्रद्धा ।
अडीच अक्षरांची शक्ती ।। १ ।।

अडीच अक्षरांची कान्ता ।
अडीच अक्षरांची दुर्गा ।
अडीच अक्षरांची इच्छा ।
अडीच अक्षरांचा योद्धा ।। २ ।।

अडीच अक्षरांचे ध्यान ।
अडीच अक्षरांचा त्याग ।
अडीच अक्षरांत भाग्य ।
अडीच अक्षरांत व्यथा ।। ३ ।।

अडीच अक्षरांतच व्यर्थ ।
अडीच अक्षरांची तुष्टी ।
अडीच अक्षरांचीच वृत्ती ।
अडीच अक्षरांतच श्वास ।। ४ ।।

अडीच अक्षरांचा मृत्यू ।
अडीच अक्षरांचाच जन्म ।
अडीच अक्षरांच्याच अस्थी।
अडीच अक्षरांचाच अग्नी ।। ५ ।।

अडीच अक्षरांचा ध्वनी ।
अडीच अक्षरांचा शब्द ।
अडीच अक्षरांचेच सत्य ।
अडीच अक्षरांचेच वित्त ।। ६ ।।

जन्मापासून मृत्यूपर्यंत अडीच अक्षरांत बांधले आयुष्य हे मानवाचे, नाही कुणा उमगले, नाही कुणा समजले !

(सामाजिक संकेतस्थळ)