|

फर्रूखाबाद (उत्तरप्रदेश) – ‘भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी तुम्हाला ‘व्होेट जिहाद’ करावा लागेल’, असे चिथावणीखोर आवाहन समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम यांनी कायमगंज येथील प्रसार सभेत मुसलमानांना केले. ‘व्होेट जिहाद’ या शब्दावरून मारिया आलम यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मारिया या काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खुर्शीद आलम यांच्या भाची आहेत. या वेळी खुर्शीद हे मंचावर उपस्थित होते. त्यामुळे खुर्शीद आलम आणि मारिया आलम दोघांवरही भा.दं.वि. कलम १८८ आणि २९५ अ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Maria Alam Khan appealed to the Muslim community to do 'Vote Jihad' in Loksabha election and to socially boycott those Muslims who support BJP.
Maria Alam is niece of Congress leader Salman Khurshid.
What the hell is 'Vote Jihad' ? pic.twitter.com/5yhwIrVQES
— Anshul Saxena (@AskAnshul) April 30, 2024
मारिया आलम यांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न !
मारिया आलम यांनी त्यांच्या भाषणात भाजपला पाठिंबा देणार्या मुसलमानांवर बहिष्कार घालण्याचेही आवाहन केले. गुन्हा नोंद झाल्यानंतर मारिया आलम या स्पष्टीकरण देतांना म्हणाल्या की, मी निवडणुकीच्या प्रचारात होते आणि माझ्या समाजात होते. मतदानाची टक्केवारी अल्प होत आहे. म्हणूनच मी ‘जिहाद’ हा शब्द वापरला. जिहाद म्हणजे संघर्ष. माझ्या बोलण्यातून तुम्ही काय अर्थ काढला ? हे मला ठाऊक नाही.
संपादकीय भूमिकायाविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी आणि हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे गप्प का आहेत ? |
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !