‘हिंदूंच्या विरुद्ध जिहाद करणे’, हा धर्मांधांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक !

जिहादच्या भयावह समस्येने भारतासह जगाला ग्रासले आहे. ‘हिंदूंच्या विरुद्ध जिहाद करणे’, हा धर्मांधांच्या जगण्याचा अविभाज्य घटकच झाला आहे. प्रारंभी ‘लव्ह जिहाद’ हा शब्दच परिचयाचा होता. आता मात्र अनेक प्रकारचे जिहाद धर्मांधांकडून करण्यात येत आहेत. या जिहादचे स्वरूप लक्षात यावे आणि ते रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत, या अनुषंगाने हा विशेषांक आम्ही प्रसिद्ध करत आहोत. जिहाद म्हणजे काय ? त्याचे प्रकार, त्याची वाढती अन् भयावह व्याप्ती यांविषयीची सूत्रे याद्वारे मांडली आहेत.

जिहाद म्हणजे काय ?

१. इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्‍याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे. (संदर्भ – ‘टीव्ही ९’ संकेतस्थळ वृत्त,१३ एप्रिल २०२१)

२. आज संपूर्ण विश्वात आतंकवाद, निरपराधांच्या हत्या आणि आर्थिक हानी चालू आहे, तो जिहादच होय ! – एक हिंदुत्वनिष्ठ

(संदर्भ : पत्रिका ‘मासिक अभय भारत’, १५ जून ते १४ जुलै २०१०)