कर्नाटकात भाजपच्या नेत्याच्या घरात घुसून ४ जणांची हत्या !

बेंगळुरू – राज्यातील गदग जिल्ह्यात मारेकर्‍यांनी भाजपचे नेते प्रकाश बाकळे यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलासह ४ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्यांमध्ये प्रकाश बाकळे यांचा मुलगा कार्तिक बाकळे (२७), परशुराम हादिमनी (५५), लक्ष्मी हादिमनी (४५) आणि आकांक्षा हादिमनी (१६) यांचा समावेश आहे. कार्तिकच्या लग्नाच्या सिद्धतेसाठी हादिमनी कुटुंब प्रकाश बाकळे यांच्या घरी आले होते. हादिमनी कुटुंब बाकळे कुटुंबाचे नातेवाईक होते.

१. प्रकाश बाकळे यांच्या पत्नी सुनंदा बाकळे या गदग-बेतागेरी नगरपालिकेच्या उपाध्यक्षा आहेत.

२. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकर्‍यांनी १८ एप्रिलच्या रात्री गदग जिल्ह्यातील गदग-बेटगेरी नगरपालिकेतील दसरा ओणी भागातील प्रकाश बाकळे यांच्या घरावर आक्रमण केले आणि ४ जणांची हत्या केली.

३. यानंतर मारेकर्‍यांनी प्रकाश बाकळे आणि सुनंदा बाकळे यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. प्रकाश बाकळे यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर मारेकरी पळून गेले.

४. या भीषण हत्याकांडानंतर कर्नाटकच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍न उपस्थित होत आहेत. काँग्रेसशासित कर्नाटकात गेल्या २४ घंट्यांत खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत.

५. कर्नाटक पोलीस ४ जणांना ठार मारणार्‍यांचा शोध लावण्यात अद्याप यशस्वी झालेले नाहीत. (काँग्रेसच्या राज्यातील पोलीसही निष्क्रीय असल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !