काबुल/इस्लामाबाद – अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांत मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. दोन्ही देशांमध्ये वीज कोसळून एकूण ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील ३३ आणि पाकिस्तानमधील २४ जणांचा समावेश आहे. त्याच वेळी १ सहस्रांहून अधिक घरांची हानी झाली असून २५० हून अधिक जनावरेही दगावल्याची माहिती आहे. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक मृत्यू पंजाब प्रांतात झाले आहेत. दोन्ही देशांच्या हवामान खात्यानुसार येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तालिबानच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचा प्रवक्ता अब्दुल्ला जनान सॅक यांनी सांगितले की, पुरामुळे राजधानी काबुल आणि देशातील इतर अनेक प्रांत यांना फटका बसला आहे. पुरामुळे जवळपास ८०० हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतांपैकी बहुतांश भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी चेतावणी हवामान खात्याने दिली आहे.

Indian In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान
जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयात शुल्क ! – ट्रम्प यांची घोषणा
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव