सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – येथील सनातनची बालसाधिका कु. गार्गी पद्माकर पवार हिने प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यातून ७ वा क्रमांक पटकावला आहे. कु. गार्गी कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड येथील श्रीमती. ग.जो. फाळके पाटील प्राथमिक विद्यालयात इयत्ता २ रीमध्ये शिकत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी २१ जानेवारी २०२४ या दिवशी प्रज्ञाशोध परीक्षा (टॅलेंट सर्च एक्झाम) घेण्यात आली. कु. गार्गी हिने या परीक्षेत २०० पैकी १७८ गुण मिळवले. कु. गार्गी हिने मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कु. गार्गी या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना म्हणाली, ‘‘नियमित प्रार्थना, नामजप आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान साधल्यामुळे मला हे यश प्राप्त झाले. परीक्षेच्या कालावधीमध्ये माझी आजी रुग्णाईत असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्याकडून अभ्यास करवून घेतला. त्यामुळेच हे यश प्राप्त झाले. या यशाचे श्रेय मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करते.’’