साधकांसाठी सूचना !
‘काही साधक ‘मी जेवण करून येतो’, असे म्हणतात. काही साधक अन्य साधकांना ‘तुमचे जेवण झाले का ?’, असे विचारतात. साधकांनी याऐवजी ‘मी महाप्रसाद घेऊन येतो’, असे म्हणाव किंवा ‘तुम्ही महाप्रसाद घेतला का ?’ असे विचारावे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अन् त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात. या अध्यात्मातील सिद्धांतानुसार आपल्या मनात जसा भाव असतो, त्याप्रमाणे त्याचा लाभ आपल्याला होत असतो. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ‘महाप्रसाद घेऊन येतो’, असे म्हटल्याने आपल्या मनात अन्नाविषयी भाव निर्माण होऊन त्याचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. यासाठी साधकांनी ‘अल्पाहार किंवा जेवण’, असे न म्हणता ‘प्रसाद-महाप्रसाद’ असे म्हणावे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले