कणकवली (सिंधुदुर्ग) : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघड

कणकवलीतून एक जण पोलिसांच्या कह्यात

कणकवली : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्या युवकाला १ एप्रिल या दिवशी दुपारी कह्यात घेतले. या युवकाने भारतीय रेल्वेच्या (आय.आर्.सी.टी.सी.) ‘ॲप’वरून मर्यादेहून अधिक तिकिटे काढून ती ग्राहकांना विकली होती. याविषयी भारतीय रेल्वेकडून पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर रेल्वे तिकिटे काढून देणार्‍या त्या संशयित युवकाची माहिती घेऊन पोलिसांनी त्याच्यासह तिकीट आरक्षणासाठी वापरला जाणारा भ्रमणभाष, संगणक आदी साहित्य कह्यात घेतले आहे.