बेंगळुरूतील रामेश्‍वरम् कॅफे बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेल्या अब्दुलकडून हिंदु नावाचा वापर !

बेंगळुरू – बेंगळुरूमधील रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट घडवून आणणार्‍या अब्दुल मतीन ताहा आणि मुसाविर हुसेन हिंदु अस्मितेचा वापर करत होते. या आतंकवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी आणि फिरण्यासाठी हिंदु नावांचा वापर केला, असे ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (एन्.आय.ए.) अन्वेषणात समोर आले आहे. अब्दुल मतीन ताहा याने विघ्नेश डी. आणि सुमित अशी हिंदु नावे धारण केली होती.

१. ‘एन्.आय.ए.’ने या दोघांवर १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. या दोघांनी मिळून मार्च २०२३ मध्ये बेंगळुरू येथील रामेश्‍वरम् कॅफेमध्ये स्फोट घडवून आणला होता.

२. यापूर्वी ‘एन्.आय.ए.’ने या प्रकरणातील एक आरोपी मुजम्मिल शरीफ याला अटक केली होती. अब्दुल मतीन ताहा आणि मुवासिर हुसेन यांना पळून जाण्यास साहाय्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने या आतंकवाद्यांना बाँब बनवण्याचे साहित्यही पुरवले होते. तो सध्या ‘एन्.आय.ए.’च्या कह्यात असून त्याचे अन्वेषण चालू आहे.

३. याआधीही मुसलमान आतंकवाद्यांनी हिंदु नावांचा वापर केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये मंगळुरूमध्ये स्फोट घडवून आणणारा आतंकवादी  शारिकने ‘प्रेमराज’ असे हिंदु नाव धारण केले होते.

४. १ मार्च २०२४ या दिवशी रामेश्‍वरम कॅफेमध्ये दुपारी स्फोट झाला होता. या स्फोटात ९ जण घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका 

याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !