Sri Lanka Ranil Wickremesinghe : भारताचे अनुकरण करून श्रीलंका पुढे जाऊ शकतो !

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे विधान

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी भारताचे कौतुक केले असून ‘भारताचे अनुकरण करून आपला देश पुढे जाऊ शकतो’, असे म्हटले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे पुढे म्हणाले की,

१. आम्हाला तांत्रिक स्तरावर आणि संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने साहाय्य लागेल. यासाठी भारत हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी मी गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असून त्यांच्याकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

२. भारताने शून्याचा शोध लावला आणि नंतर पुढे गेला. आज तो फार प्रगती केली आहे. मी म्हणू शकतो की, भारत ज्या पद्धतीने पुढे गेला आहे, ती पद्धत समजून घेण्यासारखे असून आपणही ती आपल्या देशात लागू करू शकतो. डिजिटल पायाभूत सुविधांविषयी भारत जे करत आहे, त्याचे आम्ही अनुकरण करत आहोत. आम्हाला भारताशी बरोबरी साधायला निश्‍चितच आवडेल.

संपादकीय भूमिका

श्रीलंकेला उशिरा सुचलेले शहाणपण लवकरच मालदीवलाही सुचेल, अशी अपेक्षा !