AMU Holi Muslims Attack : अलीगड मुस्लिम विद्यापिठात होळी खेळणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना मुसलमानांकडून मारहाण !

अलीगड (उत्तरप्रदेश) – अलीगड मुस्लिम विद्यापिठात (ए.एम्.यू.) २१ मार्च या दिवशी होळी खेळणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना मुसलमान विद्यार्थ्यांनी मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओही प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुसलमान विद्यार्थी हिंदु विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करतांना दिसत आहे. हिंदु विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी पळतांना दिसत आहेत. मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ केल्याचे वृत्त आहे.

१. पीडित विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘ए.एम्.यू.’च्या अभियांत्रिकी विभागाच्या आवारात होळी खेळण्यासाठी गेले होते, तेव्हा मुसलमान विद्यार्थी गर्दीत घुसले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास करण्यास चालू केले.’ या आक्रमणात अनेक हिंदु विद्यार्थी घायाळ झाले आहेत.

२. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘होळी खेळतांना आक्रमण करणार्‍यांना शिक्षा करा’, अशी मागणी पीडित हिंदु विद्यार्थ्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे.

३. मिसवा, झकीउर रहमान, झैद शेरबानी, शाहरुख साबरी, शोएब कुरेशी, अहमद मुस्तफा, अफफान शेरबानी, सेहवान खान, फैसल, अरसान सिद्दीकी इत्यादी मुसलमान विद्यार्थ्यांनी बंदुका आणि काठ्या घेऊन आक्रमण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?