पौष कृष्ण सप्तमी (२.२.२०२४) या दिवशी सौ. श्रावणी परब यांचा ३७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. रामानंद परब यांनी केलेली कविता येथे दिली आहे.
जीव तळमळतो तुजसाठी देवा ।
पाण्यात बुडबुडा जैसा ।। १ ।।
तळमळ आहे श्रावणी, तुझ्यात समष्टी सेवेची ।
सोडू नकोस कास, तू व्यष्टी साधनेची ।। २ ।।
आहेत तुझ्यात अनेक दैवी गुण ।
जणू देवानेच आणले तुला साधनेत ।। ३ ।।
समष्टी साधना करण्या आणले तुला ।
गुरुदेवांनी चरणांपाशी आपल्या ।। ४ ।।
तुझी प्रगती व्हावी यासाठी ।
केली गुरूंनी प्रार्थना ।। ५ ।।
आता त्यांच्या चरणी कर तू प्रार्थना ।
या भवसागरातून पार पडण्या ।। ६ ।।
सतत लक्ष आहे, तुझ्यावर गुरुदेवांचे ।
त्यांनाच काळजी आहे, तुझ्या प्रगतीची ।। ७ ।।
आता केवळ झोकून देऊन साधना करावी ।
हीच इच्छा आहे गुरुदेवांची ।। ८ ।।
ध्येय साध्य करण्या तळमळीने ।
कर तू त्रासांवर मात ।। ९ ।।
आता नाही ती वेळ दूर ।
जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटण्याची ।। १० ।।
करू नकोस काळजी ।
गुरुदेवच करतील तुझी ध्येयपूर्ती ।। ११ ।।
यापूर्वी मी कधीच कविता केली नव्हती. ही कविता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने लिहिली गेली. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |