कुर्ला (मुंबई) येथे हिंदु युवकावर आक्रमण करणार्‍या धर्मांधाच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर फिरवला !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – कुर्ला येथे हिंदु युवकावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधाच्या बेकायदेशीर घरावर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बुलडोझर फिरवला. १४ मार्च या दिवशी कुर्ला येथील राजेश चेटीयार या हिंदु युवकावर इन्कलाब खान आणि त्याचे सहकारी यांनी चाकूने प्राणघातक आक्रमण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी इन्कलाब खान याच्यासह त्याची पत्नी कैकशा खान, तसेच सहकारी जावेद आणि अजहर खान यांना कह्यात घेतले आहे.

१. दुकानासमोर गाडी लावल्याच्या शुल्लक कारणावरून इन्कलाब याने १४ मार्च या दिवशी राजेश चेटीयार यांच्याशी वाद घालून त्यांना आई-बहिणींवरून शिव्या दिल्या.

२. त्याच दिवशी सायंकाळी चेटीयार हे इन्कलाब यांच्या घरासमोरून जात असतांना इन्कलाब याने चेटीयार यांना अडवले आणि त्यांच्यावर चाकूने आक्रमण केले. या वेळी इन्कलाब याची पत्नी आणि त्याचे सहकारी यांनीही चेटीयार यांना मारहाण केली.

३. त्याने बांधलेल्या बेकायदेशीर घरावरही मागील वर्षभरापासून प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नव्हती. या घटनेनंतर सकल हिंदु मोर्चाच्या युवकांनी केलेल्या तक्रारीवरून प्रशासनाने इन्कलाब याचे अवैध बांधकाम तोडले आहे.

पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही !

या भागातील बेकायदेशीर धंद्यांमध्ये इन्कलाब खान याचा सहभाग असून तो करत असलेल्या समाजविघातक कारवायांच्या विरोधात स्थानिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. (तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी काय केले ? त्याच वेळी त्याच्यावर योग्य कारवाई केली असती, तर तो हिंदूवर आक्रमण करण्याएवढा उद्दाम झाला नसता ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंवर प्राणांतिक आक्रमण करण्याचे धैर्य धर्मांधांना सहज होते; कारण त्यांना कुणाचा धाकच नाही ! परिणामकारक हिंदूसंघटनामुळेच त्यांच्यावर वचक बसेल !