‘द्रमुक’ पक्षाची द्रविड संस्कृतीची विचारधारा सनातनविरोधी आहे. यामुळे त्यांनी प्रथम ब्राह्मणांना विरोध केला, नंतर हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडल्या, देवतांचा अवमान केला. हे सर्व केल्याने सत्ता मिळाली, असे द्रमुकच्या नेत्यांना वाटते. ‘सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे, असे विधान करणे’, हेही या विरोधाचाच एक भाग आहे. हिंदूंनी आज संघटित होऊन याला विरोध केला पाहिजे. द्रमुकचे समर्थक भारताचा स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणून मानतात. त्यांना तमिळनाडूवर ब्रिटीशांनी राज्य केलेले हवे आहे.